Ad will apear here
Next
‘आवास’च्या प्रारंभी समभागाची विक्री २५ सप्टेंबरपासून


मुंबई : आवास फिनान्शिअर्स लिमिटेडतर्फे २५ सप्टेंबर २०१८पासून प्रत्येकी १० रुपये दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअरची प्रति इक्विटी शेअर प्राइसनुसार (शेअर प्रीमिअमसह) प्रारंभी समभाग विक्री केली जाणार आहे. यामध्ये चार हजार दशलक्ष रुपयांच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा आणि १६,२४९,३५९ पर्यंतच्या इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे.

यामध्ये लेक डिस्ट्रिक्ट होल्डिंग्स लिमिटेडकडून ८,८१५,४३९ पर्यंत इक्विटी शेअर्स, पार्टनर्स ग्रुप ईएससीएल लिमिटेडकडून ४,२८१,९०७पर्यंत इक्विटी शेअर्स (ईएससीएल आणि लेक डिस्ट्रिक्टबरोबर, प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स), केदारा कॅपिटल अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट फंड१ कडून २३६,३३९ पर्यंत इक्विटी शेअर्स (केदारा एआयएफ १ किंवा इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर) आणि पार्टनर्स ग्रुप प्रायव्हेट इक्विटी मास्टर फंड एलएलसीकडून १,८७९,११ पर्यंत इक्विटी शेअर्स (मास्टर फंड किंवा प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डर्स) आणि सुशील कुमार अग्रवालकडून ९११,५६४ पर्यंत इक्विटी शेअर्स व विवेक विगकडून १२५,०००पर्यंत इक्विटी शेअर्स (एकत्रित अदर सेलिंग शेअरहोल्डर्स आणि प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स, इन्व्हेस्टर सेलिंग शेअरहोल्डर व प्रमोटर ग्रुप सेलिंग शेअरहोल्डरसह सेलिंग शेअरहोल्डर्स आणि अशी ऑफर फॉर सेल ऑफर फॉर सेल) समाविष्ट आहेत.

ही ऑफर २७ सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. ऑफरसाठी किंमतपट्टा प्रति इक्विटी शेअर ८१८ रुपये ते ८२१ रुपये असेल. किमान बोलीचे प्रमाण १८ इक्विटी शेअर्स आहे आणि त्यानंतर १८ इक्विटी शेअर्सच्या पटीत असेल. इक्विटी शेअर्सची नोंदणी बीएसई व एनएसई येथे केली जाणार आहे.

आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, सिटिग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एडलविस फिनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड व स्पार्क कॅपिटल अॅडव्हॉयजर्स (इंडिया) लिमिटेड हे ऑफरसाठी ग्लोबल को-ऑर्डिनेटर्स अँड बुक रनिंग लीड मॅनेजर्स (जीसीबीआरएलएम) आहेत. एचडीएफसी बँक लिमिटेड ही ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (बीआरएलएम) आहे.

‘जीसीबीआरएलएम’ व ‘बीआरएलएम’ यांच्या सल्ल्याने, सेबी आयसीडीआर रेग्युलेशन्सच्या अनुसार, कंपनी व सेलिंग शेअरहोल्डर्स अँकर इन्व्हेस्टर्सच्या सगभागाचा विचार करू शकतात. अँकर इन्व्हेस्टर बिडिंगची तारीख बिड/ऑफर सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर म्हणजे २४ सप्टेंबरला असेल.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZNBBS
Similar Posts
‘भारत डायनॅमिक्स’चे समभाग १३ मार्चला खुले मुंबई : भारत डायनॅमिक्स लिमिटेडने (कंपनी किंवा जारीकर्ता) १३ मार्च २०१८ रोजी प्रमोटर, भारताचे राष्ट्रपती आणि संरक्षण मंत्रालय, भारत सरकार (विक्रीदार समभागधारक) यांच्यामार्फत विक्री बोलीच्या माध्यमातून २२, ४५१, ९५३ समभाग खुले करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. कंपनीने ४५८,२०३ समभाग पात्र कर्मचाऱ्यांमध्ये वितरण करण्यासाठी राखून ठेवले आहेत
‘फाइन ऑरगॅनिक’ने दिले १८० कोटींचे समभाग मुंबई : फाइन ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडने १५ अँकर इन्व्हेस्टरना प्रत्येकी ७८३ रुपयांप्रमाणे (किंमतपट्ट्याची कमाल मर्यादा) एकूण १८०.०५ कोटी रुपयांचे २२ लाख ९९ हजार ४९७ इक्विटी शेअर्स दिले आहेत. अँकर बुकमध्ये सोव्हिरिअन वेल्थ फंड, एफआयआय व आघाडीचे देशांतर्गत म्युच्युअल फंड आणि आयुर्विमा कंपन्या यांचा समावेश आहे
एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचा आयपीओ २५ जुलैपासून खुला मुंबई : एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या प्रत्येकी पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या दोन कोटी ५४ लाख ५७ हजार ५५५ समभागांची विक्री करण्यात येणार आहे. हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे ८५ लाख ९२ हजार ९७०पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची आणि स्टँडर्ड लाइफ इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडतर्फे
‘कोलगेट’तर्फे कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा मुंबई : कोलगेट पामोलिव्ह (इंडिया) लिमिटेडतर्फे वार्षिक कोलगेट शिष्यवृत्ती कार्यक्रमाची घोषणा नुकतीच करण्यात आली असून, या अंतर्गत ५०० हून जास्त मुलांना एक लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्तीचा लाभ घेता येईल; तसेच ‘बायजू’चे शैक्षणिक अॅप घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला ऑफर पॅकवर एका महिन्याचे सब्‍सक्रीप्‍शन मोफत मिळेल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language